लातुर - आज मतदानाच्या दिवशी कृष्णा मंगनाळे या वराने लग्न मंडपात विवाहाची वेळ निघून जात असताना देखील आपल्या पत्नीबरोबर मतदान केंद्रावर आला आणि त्यांने मतदानाचा हक्क बजावला. 'अगोदर लग्न लोकशाहीचे आणि मग आमचे', असे म्हणत त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
'आधी लग्न लोकशाहीचं मग आमचं' म्हणत वधू-वर थेट मतदान केंद्रामध्ये..
लोकशाहीत मतदानाला असलेले महत्व याची जाणीव ठेवत कृष्णा मंगनाळे याने लग्नाच्या रेशीमगाठी घेण्याअगोदर जळकोट येथील जिल्हा प्रशालेचे मतदान केंद्र गाठले. तो नव-वधूला घेवून थेट मतदान केंद्रावार दाखल झाला. नवदाम्पत्याला पाहून मतदान केंद्रावरील उपस्थितांनी वाट मोकळी करून दिली आणि काही वेळात कृष्णाने आपला हक्क बजावत लग्नस्थळ गाठले.
लग्नाची वेळ टळू नये, म्हणून वाडीलढाऱ्यांचा कटाक्ष असतो. मात्र, लोकशाहीत मतदानाला असलेले महत्व याची जाणीव ठेवत कृष्णा मंगनाळे याने लग्नाच्या रेशीमगाठी घेण्याअगोदर जळकोट येथील जिल्हा प्रशालेचे मतदान केंद्र गाठले. मतदान करण्याची पहिलीच वेळ असल्याने कृष्णाला आपला हक्क गमवायचा नव्हता. म्हणून तो नव-वधूला घेवून थेट मतदान केंद्रावार दाखल झाला. नवदाम्पत्याला पाहून मतदान केंद्रावरील उपस्थितांनी वाट मोकळी करून दिली आणि काही वेळात कृष्णाने आपला हक्क बजावत लग्नस्थळ गाठले.