महाराष्ट्र

maharashtra

लातुरात 6 नवे कोरोना रुग्ण, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

लातूरमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळून न आल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. मात्र, बुधवारी 6 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे लातूर शहराबरोबर आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली आहे.

By

Published : Jun 4, 2020, 1:30 PM IST

Published : Jun 4, 2020, 1:30 PM IST

ETV Bharat / state

लातुरात 6 नवे कोरोना रुग्ण, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

6 new patients
लातुरात 6 नवे कोरोना रुग्ण

लातूर - जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. मात्र, बुधवारी तब्बल 6 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या रुग्णबाधितांची संख्येत घट होत असतानाच औसा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बुधवारी एकूण ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी औसा तालुक्यातील हिप्परगा येथे मुंबई येथून आलेल्या एका व्यक्तीला तर औसा येथे सोलापूरहून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. लातूर शहरातील संभाजी नगर येथील दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

यापूर्वीच या भागातील रुग्ण आढळून आल्याने सांभाजी नगर कंटेन्मेंट झोनमध्ये आहे तर रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथे 7 दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या दोघांना कोरोना झाला आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही 62 वर गेली आहे. 77 रुग्ण हे उपचार घेऊन घरी परतले आहेत, तर आतापर्यंत चौघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. बुधवारी अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथील रुग्णाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे लातूर शहराबरोबर आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details