महाराष्ट्र

maharashtra

स्वच्छतेसाठी लातूर पालिकेकडे २५ घंटा गाड्यांची भर, पालकमंत्र्याच्या उपस्थितीत लोकार्पण

शहराचा वाढता विस्तार आणि स्वच्छतेच्या दृष्टीने लातूर मनपाकडे स्वच्छता अभियानाअंतर्गत २५ घंटा गाड्यांची भर पडली आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने या गाड्या असल्याने कामात आणि वेळेतही बचत होणार आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडला.

By

Published : Sep 13, 2019, 10:37 PM IST

Published : Sep 13, 2019, 10:37 PM IST

स्वच्छतेसाठी लातूर पालिकेकडे २५ घंटा गाड्यांची भर

लातूर - शहराचा वाढता विस्तार आणि स्वच्छतेच्या दृष्टीने लातूर मनपाकडे स्वच्छता अभियानाअंतर्गत २५ घंटा गाड्यांची भर पडली आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने या गाड्या असल्याने कामात आणि वेळेतही बचत होणार आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडला.

स्वच्छतेसाठी लातूर पालिकेकडे २५ घंटा गाड्यांची भर

हेही वाचा - विलिनीकरणाला विरोध; सरकारी बँकांचे अधिकारी २६ सप्टेंबरपासून २ दिवसांच्या संपावर

स्वच्छता अभियानाअंतर्गत लातूर मनपाकडे ८२ घंटागाड्या आहेत. स्वच्छतेमधील सातत्य आणि मनपा कर्मचाऱ्यांचा सहभाग यामुळे स्वच्छतेचा पुरस्कारही लातूर मनपाला मिळालेला आहे. या नव्याने देण्यात आलेल्या २५ घंटागाड्यांना जीपीएस, लाऊडस्पिकर असणार आहेत. त्यामुळे प्रभागानुसार घंटागाड्या गेल्या आहेत का नाही याची अचूक माहिती मिळणार असल्याचे मनपा आयुक्त एम. डी सिंह यांनी सांगितले. पालकमंत्री संभाजी पाटील यांनी या घंटा गाडीत बसून एक फेरफटकाही मारला. शिवाय यामुळे स्वच्छता मोहीम गतिमान होणार असल्याचा विश्वास व्यक्त केले. स्वच्छतेमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

लातूरला लवकरच आयुक्त कार्यालय पालकमंत्री -

लातूर व नांदेड या दोन्ही जिल्ह्यात महसूल आयुक्त कार्यालय करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लातूर जिल्ह्यालगतच्या इतर २ जिल्ह्यांची गैरसोय होऊ नये म्हणुन लवकरच आयुक्त कार्यालय केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या कोपरखळ्या -

शहरातील टाऊन हॉल परिसरात या २५ घंटा गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या गाडीतून फेरफटकाही मारला. आणि गाडीतून उतरताच जिल्हयातील घाण काढण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आमदार अमित देशमुख यांच्यावर टीका केली असल्याचे म्हणत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details