कोल्हापूर- झूम प्रकल्प स्थळावर कचरा वेचक महिला जेसीबीमध्ये सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे जेसीबीमध्ये अडकून महिलेचा शिर आणि धड वेगवेगळे झाले. एका तासाच्या शोध मोहिमेनंतर कचऱ्यामध्ये महिलेचं शिर सापडले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शाहूपुरी पोलीस तपास करणार आहेत. मंगल राजेंद्र दावणे असे मृत महिलेचे नाव आहे.
जेसीबीत सापडून महिलेचे शीर धडापासून वेगळे; कोल्हापूरच्या झूम प्रकल्पातील दुर्दैवी घटना
एका तासाच्या शोध मोहिमेनंतर कचऱ्यामध्ये महिलेचं शिर सापडले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शाहूपुरी पोलीस तपास करणार आहेत. मंगल राजेंद्र दावणे असे मृत महिलेचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, संबंधित महिला ही कसबा बावडा येथे झूम प्रकल्पावर कचरा गोळा करत होती. जेसीबी उंचावर असल्याने ही महिला खाली असल्याचे चालकाला दिसले नाही. कचरा बाजूला करत असताना जेसीबीच्या फाळक्यामध्ये महिलेचे धड असल्याचे दिसून आले. त्याने तत्काळ आरडाओरड करत त्याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर महिलेचे धड सापडले. जवळपास एक तासाच्या मोहिमेनंतर या महिलेचे शिर पोलिसांना मिळून आले. दरम्यान, या महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय (सीपीआर) येथे नेला आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज पाहून पुढील तपास करणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी दिली.