कोल्हापूर- कोल्हापुरात महापुरामुळे पिण्याचे पाणी मिळणेही कठिण झाले आहे. तर या पाणीटंचाईचा अनेक पाणी विक्रेते गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. ४० रुपये किमतीचा पाण्याचा कॅन चक्क ८० रुपयाला विकले जात आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी आता येऊ लागल्या आहेत.
कोल्हापुरात पाणीटंचाईचा विक्रेत्यांकडून गैरफायदा; ४० रुपयांचे कॅन ८० रुपयांना
महापुरात एकीकडे कोल्हापूरवर मोठे नैसर्गिक संकट आले आहे. अशावेळी पाणी विक्रेते दुप्पट किंमतीने पाणी विकत आहेत. शिवाय घ्यायचे तर घ्या, नाहीतर घेऊ नका, अशा प्रकारची भाषासुद्धा या विक्रेत्यांकडून वापरली जात आहे.
महापुरात एकीकडे कोल्हापूरवर मोठे नैसर्गिक संकट आले आहे. अशावेळी हे पाणी विक्रेते दुप्पट किंमतीने पाणी विकत आहेत. शिवाय घ्यायचे तर घ्या, नाहीतर घेऊ नका, अशा प्रकारची भाषासुद्धा या विक्रेत्यांकडून वापरली जात आहे. एकतर अशा परिस्थितीत आम्ही पाण्याचा पुरवठा करत आहे आणि जर नागरिक असे बोलत असतील तर आम्ही पाणी बंद करू का ? अशी सुद्धा भाषा विक्रेत्यांकडून ऐकायला मिळत आहे.
पाणी विक्रेत्यांच्या संदर्भात अशा अनेक तक्रारी समोर आल्या असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. महापुरामुळे एका बाजूला समाजातील अनेक घटकांकडून होईल ती मदत करण्याचा ओघ सुरू आहे. तर दुसरीकडे असे लोक नागरिकांना लुटत आहेत.