कोल्हापूर -गेल्या एक आठवड्यापासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे. असे असतानाही कोल्हापुरातील आरोग्य सेविका जिल्ह्यातील प्रत्येक वड्या वस्त्यांपर्यंत जाऊन लसीकरणाची काम करताना दिसत आहेत. आजरा तालुक्यातील एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये काही आरोग्य सेविका, आशा वर्कर्स ( Health Workers Vaccination Video Kolhapur ) घनदाट जंगलातून पाण्याच्या मोठ्या लोंढ्यामधून वाट काढत लसीकरणासाठी जात असताना दिसत आहे. आजरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भादवन, उपकेंद पेरणोली अंतर्गत हरपवडे धनगरवाडा येथील हा व्हिडिओ आहे. आरोग्य सहायक पी. आर. नाईक, डी. एस. गोविलकर, आशा वर्कर रेखा पांडुरंग दोरुगडे, मतणीस लक्ष्मी केरबा जाधव, असे या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
लसीकरणासाठी आरोग्य सेविकांचा खडतर प्रवास साडे तीन ते चार किलोमीटर जंगलातून पायी प्रवास करून लसीकरण : कोणतेही कारण न सांगता साडे तीन ते चार किलोमीटर जंगलातून आणि विशेष म्हणजे गुडघाभर पाण्यातून वाट काढत आरोग्य सेविका लसीकरणाची पोहोचत आहेत. आजरा तालुक्यातील एका अशाच वस्तीवरील एक व्हिडिओ समोर आला तो पाहून नक्कीच प्रत्येकाला यांच्या या कामाविषयी असलेल्या निष्ठेबद्दल कौतुक वाटेल.
हर घर दस्तक अंतर्गत लसीकरण :दरम्यान, लहान मुलांचे नियमित लसीकरण आणि शासनाचे हर घर दस्तक या योजनेतील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी या आरोग्य कर्मचारी आजरा तालुक्यातील धनगरवाडी येथे भर पावसात पोहोचल्या. या धनगरवाडी लोकसंख्या जवळपास 125 इतकी लोकसंख्या आहे. त्यामुळे आपले कर्तव्य पार पाडत आरोग्य सहायक पी. आर. नाईक, डी. एस. गोविलकर, आशा वर्कर रेखा पांडुरंग दोरुगडे, मतणीस लक्ष्मी केरबा जाधव या चार आरोग्य सेविका डोंगरदऱ्यातून मार्ग काढताना दिसल्या.
अनेक वड्या वस्त्यांवर पावसाळ्यात अशीच परिस्थिती :दरम्यान प्रत्येक पावसाळ्यात अशाच पद्धतीने अनेक आरोग्य सेवकांसह नागरिकांना सुद्धा प्रवास करावा लागतो. या ठिकाणी रस्ता तर नाहीच शिवाय एखादे वाहन सुद्धा जात नाही. त्यामुळे पायी चालत जावून सेवा द्यावी लागते. त्यामुळे स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा इथपर्यंत रस्ते होऊ शकले नसल्याने आता तरी शासनाने याकडे लक्ष देऊन सर्वांच्या गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा -CM Eknath Shinde: एनडीएच्या बैठकीला शिंदे गटाचे केसरकर लावणार हजेरी