कोल्हापूर- गणेशोत्सव अगोदर कोल्हापूकर मोठ्या उत्सुकतेने त्र्यंबोली यात्रेची वाट पाहत असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे या उत्साहावर पाणी फिरले आहे. शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे अहवान असल्याने तरुण मंडळाने देखील याला प्रतिसाद देत, साध्या पद्धतीने त्र्यंबोली यात्रा साजरी केली. शिवाय दरवर्षी या यात्रेला 'पी-ढबाक'ची साथ असते. यंदा मात्र पी-ढबाक शिवाय ही यात्रा संपन्न होत आहे. श्रावण महिना लागेपर्यंत ही यात्रा आठवड्याच्या मंगळवारी व शुक्रवारी साजरी केली जाते.
आषाढ पौर्णिमा झाल्यानंतर नव्या पाण्याची अंघोळ देवीला घालून पूजा अर्चा करुन त्र्यंबोली यात्रा साजरी केली जाते. यावेळी पारंपरिक वाद्य असलेले पी-ढबाकच्या गजरात मिरवणूक काढली जाते. नदीचे पाणी मंदिरापर्यंत नेले जाते. तर शहरातील पेठांमध्ये त्र्यंबोली यात्रा म्हणजे मोठ्या उत्साहाचा सोहळा असतो. गुलालाची उधळण करत मोठ्या भक्तिभावाने यात्रा साजरी केली जाते.
कोल्हापूर: त्र्यंबोली यात्रा यंदा 'पी-ढबाक' शिवाय पडणार पार...
आषाढ पौर्णिमा झाल्यानंतर नव्या पाण्याची अंघोळ देवीला घालून पूजा अर्चा करुन त्र्यंबोली यात्रा साजरी केली जाते. यावेळी पारंपरिक वाद्य असलेले पी ढबाकच्या गजरात मिरवणूक काढली जाते. नदीचे पाणी मंदिरापर्यंत नेले जाते. तर शहरातील पेठांमध्ये त्र्यंबोली यात्रा म्हणजे मोठ्या उत्साहाचा सोहळा असतो.
त्र्यंबोली यात्रेला साधेपणाने सुरुवात झाली असून, केवळ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करत त्र्यंबोली यात्रा झाली. टेंबलाई टेकडी येथील त्र्यंबोली मंदिर दर्शनासाठी बंद आहे. येथे प्रतिकात्मक स्वरुपात सर्व धार्मिक विधी करण्यात आले.
दरम्यान, शहरातील जुन्या पेठांसह उपनगर आणि कसबा बावडा परिसरात त्र्यंबोली यात्रेला शुक्रवारी साधेपणाने सुरुवात झाली. घरगुती नैवेद्य देवीला अर्पण करण्यासाठी लगबग वाढली असली तरी केवळ एक ते दोन जणांनाच मंदिर परिसरात प्रवेश दिला जात आहे. तर पंचगंगा नदी काठावर नैवैद्य सोडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक भक्तांनी घरातूनच नदीला नैवेद्य अर्पण केला आहे. तर अनेकजण या यात्रेवेळी रस्सा मंडळचे आयोजन करतात. मात्र, त्याला देखील यंदा फाटा दिला आहे.