महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार - जिल्हाधिकारी दौलत देसाई

प्रशासकीय स्तरावर निवडणूक यंत्रणा सक्षम असल्याचा विश्वास जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

दौलत देसाई निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी

By

Published : Sep 21, 2019, 8:39 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघ असून सर्व मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता काटेकोरपणे पाळली जाईल, याची दक्षता घेतली जाईल. प्रशासकिय स्तरावर निवडणूक यंत्रणा सक्षम असल्याचा विश्वास जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

दौलत देसाई निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी

हे ही वाचा -समाजस्वास्थ बिघडवणाऱ्या भाजपला 'चले जाव' म्हणायची वेळ - शरद पवार

कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कागल, राधानगरी, चंदगड, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ आणि शाहूवाडी या दहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे देसाई यांनी सांगितले. निवडणुकीची अधिसूचना 27 सप्टेंबरला जारी होणार असून 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 5 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर अर्ज माघारीची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर आहे. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी करण्यात येणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

हे ही वाचा -दिवाळीपूर्वीच निवडणुका; २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ला मतमोजणी

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमधील मतदारांनी आपली नावे तपासावीत आणि आपल्या नावाची शहानिशा करून आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन सुद्धा यावेळी देसाई यांनी केले आहे.

हे ही वाचा -'EVM मध्ये घोळ करण्यासाठी दोन दिवसांनी मतमोजणी होणार आहे का?'

ABOUT THE AUTHOR

...view details