महाराष्ट्र

maharashtra

तेजस्विनी पाटील ठरल्या कोल्हापुरातील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्या

१५ जानेवारीला राज्यात ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. त्यानंतर १८ जानेवारीला या निवडणुकीचे निकालही हाती आले. तरुण उमेदवारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग हे या निवडणुकीचे वैशिष्य ठरले आहे.

By

Published : Jan 21, 2021, 10:34 AM IST

Published : Jan 21, 2021, 10:34 AM IST

Tejaswini Patil
तेजस्विनी पाटील

कोल्हापूर - १८ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले. अनेक ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका बिनविरोध झाल्या, तर अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढती पाहायला मिळाल्या. यावेळच्या निवडणुकीत तरूण उमेदवारांची संख्या लक्षणीय होती. 20 ते 30 वयोगटातील अनेक सदस्य ग्रामपंचायतमध्ये निवडून गेले आहेत. करवीर तालुक्यातील शिये गावातील तेजस्विनी अभिजित पाटील या कोल्हापुरातील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्या ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांचे व गावाचे जिल्हाभरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

तेजस्विनी पाटील तरुण ग्रामपंचायत सदस्या ठरल्या आहेत
तेजस्विनी पाटील यांनी नुकतीच पूर्ण केली वयाची 21 वर्षे पूर्ण -

शिये गावातील नूतन ग्रामपंचायत सदस्या तेजस्विनी अभिजित पाटील यांनी सुद्धा नुकतीच वयाची 21 वर्षे पूर्ण केली आहेत. सध्या त्या पदवी(बीए)च्या तृतीय वर्षात शिकत आहेत. त्यांचे पती पत्रकार आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्यातील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्या ठरल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 433 ग्रामपंचायतींची निवडणुक लागली होती. त्यातील 47 ग्रामपंचायती आणि 720 सदस्य बिनविरोध निवडणून आले होते. राहिलेल्या 386 ग्रामपंचायतींची प्रत्यक्षात निवडणूक पार पडली. यामध्ये एकूण साडे सात हजारांवर उमेदवार रिंगणात होते. सर्वाधिक उमेदवार तरुण वर्गातील होते. विजयी उमेदवारांमध्ये सुद्धा 20 ते 30 वयोगटातील उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

शिये गावात सत्तांतर -

शिये येथे पूर्वी शिवसेनाप्रणीत आघाडीची सत्ता होती. मात्र, यावेळी विरोधकांचा सुपडासाफ करत स्थानिक आघाडीने बाजी मारली आहे. आता स्थानिक आघाडीचा ग्रामपंचायतवर झेंडा फडकणार आहे. आघाडीचा 17 पैकी 10 जागांवर विजय झाला आहे. तर, शिवसेनाप्रणीत 6 जणांचा आणि एका अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details