तब्बल दीड महिन्यांनी धावली 'लालपरी', कोल्हापूर-पुणे मार्गावर एसटी सुसाट
गेल्या दीड महिन्यापासून थांबलेली एसटीची चाके पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. तब्बल दीड महिन्यांनी लालपरी रस्त्यावर धावायला सज्ज झाली आहे. राज्य सरकारने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याच्या सूचना दिल्यानंतर आजपासून कोल्हापूर-पुणे बससेवा सुरू झाली आहे.
कोल्हापूर - गेल्या दीड महिन्यापासून थांबलेली एसटीची चाके पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. तब्बल दीड महिन्यांनी लालपरी रस्त्यावर धावायला सज्ज झाली आहे. राज्य सरकारने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याच्या सूचना दिल्यानंतर आजपासून कोल्हापूर-पुणे बससेवा सुरू झाली आहे. सकाळपासून तीन फेऱ्या झाल्या असून प्रवास क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. एसटी सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला असून चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याचा आढावा घेतला ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी..
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात ब्रेक द चेन या नियमानुसार लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये एसटी प्रवासाला बंदी घालण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील एसटी जवळपास दीड महिने बंद होती. जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, तसतसे राज्यातील काही निर्बंध शिथिल केले आहेत. आजपासून राज्यातील लांब पल्ल्याच्या एसटी बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आज कोल्हापूर-पुणे मार्गावर एसटी सेवा सुरू झाली आहे. राज्य शासनाच्य नियमानुसार प्रवाशी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत तसेच प्रवाशांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. आज सकाळपासून कोल्हापूर विभागीय मंडळातून तीन फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती व्यवस्थापक अजय पाटील यांनी दिली. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून देखील एसटी प्रवाशांना घेऊन आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.