कोल्हापुर :कोल्हापूरची धार्मिक एकात्मता तसेच पुरोगामी विचार जपण्यासाठी आज हजारो कोल्हापूरकर नागरिक एकवटले आहेत. कोल्हापुरातील नर्सरी गार्डन येथील राजर्षी छत्रपती शाहू समाधीस्थळाला अभिवादन करून शाहू महाराज छत्रपतींच्या उपस्थितीत ही शिव-शाहू सद्भावना फेरी काढण्यात येत आहे. यासाठी अठरापगड जाती- धर्मांच्या नागरिकांनी यात सहभाग नोंदवला. ही रॅली सी.पी.आर. रुग्णालय मार्गे छ. शिवाजी महाराज चौकात जाणार असून येथे राष्ट्रगीत होणार आहे. त्यानंतर रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीत सर्वात पुढे तिरंगा, भगवा ध्वज लावण्यात आला असून शिवछत्रपतींसह राष्ट्रपुरुषांच्या घोषणा देण्यात देण्यात आल्या. अनेक राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पोस्टर्स यात्रेत दिसत आहेत.
शिव-शाहू सदभावना रॅली : शिव-शाहूच्या जयघोषात रॅली : गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदू मुस्लिम समाजामध्ये शेड निर्माण करण्याचा प्रयत्न कोल्हापूरमध्ये झाला. नेहमी शांत राहणाऱ्या कोल्हापुरात दंगल उसळली. यामुळे राज्यातच नाही तर, देशभरात कोल्हापूर जिल्ह्यातच राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना तडा गेला का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. यामुळे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हजारो कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले. शिव-शाहू सदभावना त्यांनी रॅली काढली. ही रॅली कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून सुरू करण्यात आली. रॅली सीपीआर चौक, महानगरपालिका चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. यावेळी रॅलीच्या पुढे भगवा ध्वज आणि तिरंगा ध्वज होता. ही रॅली श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत सुरू झाली. यावेळी मालोजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह राजश्री शाहू सलोखा मंचचे वसंत मुळीक, आर के पवार, इंद्रजीत सावंत यांच्यासह आयोजक, आमदार उपस्थित होते.