कोल्हापूर -कचरा गोळा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार कोल्हापुरात आज (शुक्रवार) घडला. प्रभागात कचरा उठावासाठी गेलेल्या विजय अवघडे याला कदमवाडी परिसरातील नागरिकांनी मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत मारहाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत कामबंद ठेवणार अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
कोल्हापुरात कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
कचरा गोळा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार कोल्हापुरात आज (शुक्रवार) घडला. प्रभागात कचरा उचलण्यासाठी गेलेल्या विजय अवघडे याला कदमवाडी परिसरातील नागरिकांनी मारहाण केली.
विजय अवघडे हे आज (शुक्रवार) सकाळी कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक १८ या परिसरात कचरा उचलण्यासाठी गेले होते. ते आपल्या टिप्पर गाडीतून कचरा गोळा करत असताना परिसरातील नागरिकांसोबत कचरा उचलण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. त्यातून जवळपास दहा अज्ञात महिला आणि पुरुषांनी घरात कोंडून अवघडे यांना मारहाण केली. त्याची माहिती युनियन ऑफिसरला दिली. अवघडे हे कोल्हापूर महानगरपालिका संचालीत डी. एम.एंटरप्राइज येथे कार्यरत आहेत. ही बाब समजताच सर्व कचरा उठाव कर्मचाऱ्यांनी दसरा चौकात येऊन कामबंद करून या घटनेचा निषेध केला. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत कामबंद ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांच्यावतीने दिला आहे.