कोल्हापूर - कोल्हापुरात कोरोनाने अक्षरशः कहर केला असून सोमवारी जिल्ह्यात तब्बल 52 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली असून आकडा १०२ वर पोहोचला आहे.
कोल्हापूरात 24 तासांत कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट; आकडा शंभरी पार
कोल्हापूरात गेल्या २४ तासात कोरोनाचे ५२ नवे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेल्या २४ तासात सापडलेल्या बाधितांमुळे जिल्ह्याच्या आकडा एका दिवसात ५० वरुन सरळ १०२ वर जाऊन पोहोचला आहे.
रविवारी रात्री कोल्हापुरात एकूण रुग्णांची संख्या 50 होती. मात्र, २४ तासात ही संख्या आता 102 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 7 दिवसांपासून प्रत्येक दिवशी कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि आजसुद्धा हेच पाहायला मिळाले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी सोमवार घातवार ठरला आहे. जिल्ह्यात आजवरची एकाच दिवसात आढळलेली ही सर्वोच्च संख्या ठरली आहे.
कालपर्यंत एकूण 50 रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली होती. तीच आता 24 तासात दुप्पट झाली असून एकूण रुग्णांची संख्या 102 वर पोहोचली आहे. यातील एकूण 102 पैकी आत्तापर्यंत 13 जण कोरोनामुक्त झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, एकाच वेळी 52 नवीन रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.