महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संभाजीराजेंचा यू टर्न; आरक्षणाला विरोध नाहीच, मराठा आरक्षणासाठी प्रयत्न

आरक्षणाच्या मुद्यावरुन खासदार छत्रपती संभाजीराजेंनी यू टर्न घेतला आहे. आता मराठा आरक्षण दृष्टीक्षेपात आहे. ते टिकण्यासाठी प्रयत्न मी करत आहे.

आरक्षणावरुन संभाजीराजेंचा यु टर्न

By

Published : Jun 22, 2019, 7:32 PM IST


कोल्हापूर - आरक्षणाच्या मुद्यावरुन खासदार छत्रपती संभाजीराजेंनी यू टर्न घेतला आहे. आता मराठा आरक्षण दृष्टीक्षेपात आहे. ते टिकण्यासाठी प्रयत्न मी करत आहे. मग मी आत्ता आरक्षणाला विरोध कसा करीन ? असे ट्विट करत संभाजीराजेंनी यू टर्न घेतला आहे.

आरक्षण गेल खड्ड्यात, सर्वच जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करा, असे ट्विट करत संभाजीराजेंनी शुक्रवारी आपला संताप व्यक्त केला होता. उस्मानाबादमधील देवळाली गावचा अक्षय देवकर या विद्यार्थ्याने दहावीला ९४ टक्के गुण मिळूनही आत्महत्या केली होती. लातूरमधील शाहू कॉलेजला प्रवेश मिळेल की नाही या नैराश्यातून अक्षयने आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी आरक्षण गेल खड्ड्यात म्हणत आपला संताप व्यक्त केला होता.

मराठा आरक्षणासाठी गेल्या १२-१३ वर्षापासून मी झटत आहे. बहुजनांना न्याय देण्याची राजर्षी शाहू महाराजांची जी भूमिका होती. ती घेऊन मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा आरक्षण दृष्टीक्षेपात आहे. सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे अशी माझी भूमिका आहे असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

'शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही' असे म्हणत छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील सर्वच जातींच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था सुद्धा केली होती. त्यामुळे आजही सर्व विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळावे अशी सर्व समाजांच्या वतीने माझी मागणी असल्याचे संभाजी छत्रपती म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details