महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maratha Andolan: अजित पवार सभेसाठी कोल्हापुरात आल्यास उद्रेक, सकल मराठा समाजाचा इशारा

Maratha Andolan : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेमुळे कोल्हापूरमधील सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवारांनी कोल्हापूरमध्ये येवू नये, असा इशारा यावेळी देण्यात आलाय. अजित पवार सभेसाठी कोल्हापुरात आल्यास मराठा समाजाचा उद्रेक होईल, असा इशारा मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिलाय. (Lathicharge on Maratha Protesters)

Maratha andolan
मराठा समाजाचे समन्वयक

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 10:52 PM IST

मराठा समाजाच्या समन्वयकांची प्रतिक्रिया

कोल्हापूरMaratha Andolan :जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. कोल्हापुरातही सकल मराठा समाज आक्रमक झालाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 10 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा होत आहे. या सभेसाठी अजित पवार हे कोल्हापुरमध्ये येणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतो, असं आश्वासन देऊन ते न पाळणाऱ्या अजित पवारांनी कोल्हापुरात येऊ नये. अजित पवार कोल्हापूरमध्ये आल्यास मराठा समाजाचा उद्रेक होईल, असा इशारा मराठा समाजाचे समन्वयक वकील बाबा इंदुलकर यांनी दिलाय.

मराठा आंदोलकांवर पोलिसांचा अमानुष लाठीहल्ला :मराठा आरक्षणासाठी जालन्यात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केलाय. या घटनेचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. कोल्हापुरातील मारुती मंदिरात आज सायंकाळी मशाल पेटवून हिशोब चुकता करण्याचा निर्धार करण्यात येणार आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राची माफी मागूनच 10 तारखेला कोल्हापुरात यावं. या घटनेचं उत्तरदायित्व घ्यावं. अन्यथा, त्यांचा सभेत हिशोब चुकता केला जाईल, असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिलाय. (Lathicharge on Maratha Protesters)


मराठा समाजाचा प्रतिनिधी नाही :राज्यातील सकल मराठा समाजाच्या जीवावर लोकसभा विधानसभा राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी इशारा दिलाय. मराठा समाजावर इतका अन्याय होऊनही एकही लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाही. ही मराठा समाजाची शोकांतिका आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. राज्यभरातील मराठा पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत मराठा समाजाचे पदाधिकारी जो निर्णय घेतील, त्या निर्णयाशी आम्ही बांधील असल्याचंही देसाई यावेळी म्हणाले.


ऐतिहासिक मारुती मंदिरातून फुंकणार रणशिंग :कोल्हापुरातील राजारामपुरीत असणाऱ्या मारुती मंदिरात अनेक मोर्च्यांचे रणशिंग फुंकले गेलेय. आज या ठिकाणाहून मशाल पेटवून या मशालीचा वनवा राज्यभर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असं बाबा इंदुलकर आणि दिलीप देसाई यांनी सांगितलंय. (Maratha Protesters warning to Ajit Pawar)

हेही वाचा :

  1. Lathicharge on Maratha Protester : मराठा आंदोलन चिघळलं, पाहा सरपंचाने पेटवली नवीकोरी कार
  2. Maratha Reservation Movement : मराठा आंदोलन अजूनही जिवंत.. कधीही उद्रेक होऊ शकतो : नरेंद्र पाटील
  3. नांदेडमधील 'मराठा मूक आंदोलन' भाजपा प्रणित - अशोक चव्हाण

ABOUT THE AUTHOR

...view details