कोल्हापूर - राष्ट्रवादीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ कागल येथे शरद पवारांची सभा होत आहे. यावेळी सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांच्या भाषणाच्या क्लिप्स दाखवण्यात आल्या.
कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या सभेत दाखवले राज ठाकरेंचे भाषण
कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ कागल येथे शरद पवारांची सभा होत आहे. यावेळी सभेच्या सुरुवातीला राज ठाकरे यांच्या भाषणाच्या क्लिपचा वापर करण्यात आला.
कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा
राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता पुन्हा प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आघाडीचे राष्ट्रवादीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ कागल येथे शरद पवारांची सभा होत आहे. या सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांच्या भाषणाच्या क्लिपचा वापर करण्यात आला आहे.
शरद पवार यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -
- काय वाटेल ते सहन करू, पण बाबासाहेबांनी सर्वसामान्य घटकांचा विचार करून बनवलेली घटना बदलण्याचा प्रयत्न केला तर तो उलथून लावू.
- रिझर्व्ह बँकमध्ये कोणी हस्तक्षेप केला नाही, पण मोदींनी केला.
- या सर्वांना सामान्य माणसांबाबत जराही चिंता नाही.
- शेतकऱ्यांनी काही मागण्या केल्या होत्या आणि त्याला दानवेंनी साला म्हटले, सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असे बोलतो, ही शेतकऱ्यांची अवहेलना आहे.
- सत्तेचा माज असणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे.
- भारतात जेवढे पण हल्ले झाले, ते भाजप सरकारच्या काळात झाले.
- यांच्या हातात देश सुरक्षित नाही. देशात परिवर्तन करायचे आहे, त्यामुळे एक एक खासदार महत्वाचा आहे.
Last Updated : Apr 11, 2019, 10:26 PM IST