महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कारगिल विजय दिवस.! 'दोन महिन्यांचा संसार..मात्र, आयुष्यभरासाठी ते अभिमान देऊन गेले'

भारतीय लष्कराने 26 जुलै 1999 रोजी कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. 8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्याने या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले होते.

Martyr ashok biranje kolhapur
कारगिल हुतात्मा जवान अशोक बिरंजे

By

Published : Jul 26, 2020, 3:53 AM IST

कोल्हापूर -भारतीय लष्कराने 26 जुलै 1999 रोजी कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. याच युद्धात कोल्हापूर जिल्ह्यातील अशोक बिरंजे आणि मच्छिंद्र देसाई हुतात्मा झाले होते. त्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची गाथा आजही येथील पंचक्रोशीत ऐकायला मिळते. याबाबत कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून ईटीव्ही भारतने या दोन्ही हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला आहे.

28 जून 1999 साली कारगिल युद्धात कोल्हापूरच्या अशोक बाबुराव बिरंजे यांना वीरमरण आले होते. अशीच काहीशी स्थिती पन्हाळा तालुक्यातील कळे गावच्या सुनीता देसाई यांची सुद्धा झाली होती. सैन्यातील मराठा रेजिमेंट मधल्या जवान मच्छिंद्र रामचंद्र देसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. मात्र त्यांना सुद्धा कारगिल युद्धात 3 जुलै 1999 रोजी वीरमरण आल्याने त्या सुद्धा त्यांच्या आठवणीत आजही जगत आहेत.

कारगिल हुतात्मा जवान अशोक बिरंजे यांच्या पत्नी श्रीमती सविता बिरंजे...

केवळ दोन महिन्यांचा संसार, मात्र आयुष्यभरासाठी ते अभिमान देऊन गेले...

25 एप्रिल 1999 रोजी लग्न झाले. लग्न होऊन फक्त दोन माहिने झाले होते. तिकडे भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. कारगिलच्या युद्धाला सुद्धा सुरुवात झाली होती. पती बीएसएफ मध्ये होते त्यामुळे लगेचच त्यांना परतावे लागले. पोहोचल्यावर त्यांचे पत्र सुद्धा मिळाले होते. मात्र, पुढच्या आठवड्यानंतर लगेचच त्यांना कारगिल युद्धात वीरमरण आल्याचे समजले. लग्नानंतर पाहिलेल्या अनेक स्वप्नांचा क्षणार्धात चुराडा झाला. केवळ दोन महिन्यांचा संसार, मात्र आयुष्यभरासाठी जो अभिमान देऊन गेले ते खूप मोलाचे असल्याचे सांगताना कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या कोल्हापूरातील जवानाच्या पत्नी सविता अशोक बिरंजे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सुरुवातीला केवळ पती जखमी झाले, अशी माहिती मिळाली होती. मात्र दोन दिवसांनी त्यांचे पार्थिवच गावात आल्यानंतर पती हुतात्मा झाल्याचे समजल्याचे सविता बिरंजे सांगतात. त्यांना या मोठ्या धक्क्यातून सावरायला अनेक वर्षे लागली. पाहिलेली स्वप्नं पूर्ण तर नाही झाली. मात्र, समाजात वावरत असताना जो सन्मान मिळतो, सर्वजण विरपत्नी बोलत असतात, हीच एक जगण्यासाठी शक्ती देत असतात. असेही विरपत्नी बिरंजे म्हणतात. या घटनेला आज 20 वर्षे पूर्ण झालीयेत तरीही त्यांच्या आठवणींमध्ये जगणे माझ्यासाठी खुप काही असल्याचेही त्या म्हणतात.

कारगिल हुतात्मा जवान मच्छिंद्र देसाई...

हेही वाचा -गृहमंत्र्यांनी घेतली 'त्या' आजींची भेट.. साडी चोळी आणि एक लाखांची मदत

कारगिल युद्धात कोल्हापूरमधील दोन जवानांना वीरमरण...

कारगिल युद्धात महाराष्ट्रातील 25 जवानांना वीरमरण आले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातल्या वैरागवाडी मधील अशोक बाबुराव बिरंजे आणि पन्हाळा तालुक्यातल्या कळे गावातील मच्छिंद्र रामचंद्र देसाई यांचाही समावेश होता. अशोक बिरंजे हे कारगिल युद्धात शहीद झालेले जिल्ह्यातील पाहिले जवान आहेत. 28 जून 1999 रोजी त्यांना वीरमरण आले. तर मच्छिंद्र देसाई यांना 3 जुलै 1999 रोजी वीरमरण आले.

वीर जवानांची पंचक्रोशीसह अनेक ठिकाणी स्मारके आणि स्वागत कमानी...

वीरमरण प्राप्त झालेल्या दोन्ही जवानांच्या गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी गावासह पंचक्रोशीत विविध ठिकाणी स्मारक आणि स्वागत कामानी उभारल्या आहेत. अनेक क्रीडांगणांना, वाचनालयांना या दोन्ही वीर जवानांची नावं दिली आहेत. अशोक बिरंजे यांच्या कुटुंबीयांनी तर आपल्या घराच्या अंगणात मंदिर उभा केलं आहे. मंदिरात बिरंजे यांचा 65 किलो वजनाचा पंचधातूचा पुतळा बसविण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details