महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पन्हाळा गडावर पुरंदरेंच्या अस्थी विसर्जनाला जनसंघर्ष सेनेचा विरोध; म्हणाले...

‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare Passes Away) यांचे सोमवारी सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले आहे. त्यांच्या अस्थीचे विसर्जन 11 किल्यांवर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याला जनसंघर्ष सेनेने विरोध दर्शवला आहे.

पन्हाळा गडावर पुरंदरेंच्या अस्थी विसर्जनाला जनसंघर्ष सेनेचा विरोध; म्हणाले...
Jana Sangharsh Sena is opposed to Immersion of Shivshahir Purandare's bones on 11 forts

By

Published : Nov 17, 2021, 12:16 PM IST

कोल्हापूर - केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याच्या कायद्याप्रमाणे किल्ल्यांवर अस्थी विसर्जनाला बंदी असताना ब. मो. पुरंदरे यांच्या अस्थी पन्हाळगडावर विसर्जित करण्याचा घाट घातला जात असून या प्रकाराला कोल्हापुरातल्या जनसंघर्ष सेनेने तीव्र विरोध नोंदवला आहे. पुरंदरेंच्या अस्थी रायगडसह 11 किल्यांवर विसर्जित करण्यात येणार असून पन्हाळा किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे याला तीव्र विरोध दर्शविण्यात आला असून कोणत्याही पद्धतीने अस्थी विसर्जन करू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी पत्रकाद्वारेदिला आहे.

जनसंघर्ष सेनेचा पत्रक जारी करून विरोध
काय म्हंटले आहे पत्रकात -गडकिल्ले गंगेचा घाट नाही, मराठी माणसाच्या शौर्याच्या इतिहासाचे जिवंत प्रतीक आहे, अशा प्रकाराला जिल्हा प्रशासनाने तात्काळ पायबंद घालावा. अन्यथा पन्हाळ्यावर अस्थी नेण्यापासून रोखण्यात येईल, असे म्हणत कोल्हापूरातील जनसंघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनु आपल्या पत्रकातून इशारा दिला आहे. पत्रकात पुढे म्हंटलं आहे की, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यापासून निर्माण होण्याची शक्यता असून कायद्याचा भंग करून असा प्रकार होऊ देणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याच्या कायद्याप्रमाणे किल्ल्यांवर अस्थी विसर्जनाला बंदी असताना ब. मो. पुरंदरे यांच्या अस्थी पन्हाळगडावर विसर्जित करण्याचा घाट घातला जात असून या प्रकाराला आमचा तीव्र विरोध आहे. पुरंदरेंच्या अस्थी रायगडसह 11 किल्यांवर विसर्जित करण्यात येणार असून पन्हाळा किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने याठिकाणी अस्थी विसर्जन करु देऊ नये अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असेही पत्रकात म्हंटलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details