कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप व शिंदे गटात सोबत गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणात देखील मोठे बदल झाले आहेत. राज्यात सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी सत्ता स्थापन झाली (Hasan Mushrif Welcome In Kolhapur) असून आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी मंत्री पदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला. यानंतर ते आज (Cabinet Minister Hasan Mushrif) दुपारी बाराच्या सुमारास कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. (Hasan Mushrif Kagal Gathering) ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. तर छत्रपती ताराराणी चौकात हजारो कार्यकर्ते एकत्र आले होते.
गेलेले कार्यकर्ते परत येतील :यावेळी मुश्रीफ यांनी छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर मार्गे रॅली दसरा चौकात आली. येथे मुश्रीफ यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. यानंतर नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळाला देखील त्यांनी अभिवादन केले. ते करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झाले. दरम्यान आज संध्याकाळी कागल येथे त्यांची जाहीर सभा होणार असून या सभेत पुढील राजकीय वाटचालीची ते माहिती देणार आहेत. तर आज माझे जंगी स्वागत केले हे पाहून मी भारावून गेलो आहे, असे ते यावेळी म्हणाले. तर त्यांना सोडून गेलेले कार्यकर्ते देखील लवकरच आपल्या सोबत पुन्हा येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.