महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis : कोल्हापूर उत्तरची गदा आता सत्यजित कदम यांचा हाती द्या - फडणवीस

शिवछत्रपतींच्या या भूमीत आल्यावर, ताराराणींचा पुतळा पाहिल्यानंतर मला नेहमीच अभिमान वाटतो. दरवेळी यायचो, तेव्हा शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक भलेमोठे होर्डिंग दिसायचे. आज हिंदूत्त्वाचे नामोनिशान येथे दिसत नाही, याचे वाईट वाटते असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

सभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
सभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

By

Published : Apr 10, 2022, 7:34 AM IST

कोल्हापूर - शिवछत्रपतींच्या या भूमीत आल्यावर, ताराराणींचा पुतळा पाहिल्यानंतर मला नेहमीच अभिमान वाटतो. दरवेळी यायचो, तेव्हा शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक भलेमोठे होर्डिंग दिसायचे. आज हिंदूत्त्वाचे नामोनिशान येथे दिसत नाही, याचे वाईट वाटते असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

सभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

कोल्हापूरातला प्रत्येक महत्वाचा विषय सोडवला - ही लढाई व्यक्तीची नाही, तर विचारांची आहे. ज्यांनी राममंदिराला विरोध केला, ज्यांनी 370 रद्द करण्याला विरोध केला, आपल्याला त्यांना परास्त करायचे आहे. यांना तर ‘काश्मीर फाईल्स’ची पण अ‍ॅलर्जी आहे. कोल्हापूरच्या टोलचा प्रश्न होता, एका झटक्यात आम्ही तो सोडवला. इथल्या पाण्याचा प्रश्न असो की विमानतळाचा, प्रत्येक विषय सोडविला. प्रश्न सोडविणार्‍या व्यक्तीचे नाव आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी असही ते म्हणाले.

100 कोटींच्या वसुलीत मग्न आहेत - कोल्हापुरात पूर आला, तेव्हा आम्ही दिलेली मदत आणि तुम्ही दिलेली मदत ही येथील लोकांच्या स्मरणात आहे. तुमच्यात देण्याची दानतच नाही. तुम्ही फक्त घरं भरण्याचे काम केले. गोकूळची निवडणूक होईस्तोवर लॉकडाऊन लागू दिला नाही. निवडणूक होताच लागू केला. त्याकाळात ज्यांचे मृत्यू झाले, त्याचे उत्तर कोण देणार? सारेच्या सारे 100 कोटींच्या वसुलीत मग्न आहेत असेही फडणवीस म्हणाले.


वेश्यांच्या निधीतही भ्रष्टाचार -आज महाराष्ट्रात सरकार नाही, तर केवळ भ्रष्टाचार आहे. सामान्य माणूस होरपळत असताना त्याला कोणतीच मदत दिली नाही. यांना पुळका दारूचा आला. दारु विकणार्‍याला सवलती दिल्या आणि पिणार्‍याला ती खुली करून दिली. पेट्रोल-डिझेलचे दर प्रत्येक भाजपाशासित राज्याने कमी केले. हे सरकार 52 रुपये प्रतिलिटर आपल्या खिशात टाकतात. पण, यांना भाव कमी करावा वाटत नाही. हे सरकार इतके नालायक आहे की, वेश्यांसाठीच्या निधीत सुद्धा भ्रष्टाचार करते असा आरोप सुद्धा फडणवीस यांनी यावेळी केला.

यांची उपस्थिती - यावेळी उमेदवार सत्यजित कदम यांच्या आजच्या प्रचार सभेला खा. संजयकाका पाटील, विनय कोरे, प्रकाश आव्हाडे, हर्षवर्धन पाटील, समरजितसिंह घाटगे, रणजितसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडिक, अमल महाडिक, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, चंद्रशेखर बावनकुळे, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

हेही वाचा -Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरची बाजी; पृथ्वीराज पाटीलने जिंकली मानाची गदा

ABOUT THE AUTHOR

...view details