कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना ताब्यात दोन दिवसांच्या तपासणी नंतर ताब्यात घेण्यात आले आहे. त्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. डॉ. अशोक माने, मुख्य कार्यकारी अधिकारी, आर जे पाटील, व्यवस्थापक (CMA) साखर कारखाना, अल्ताफ मुजावर उप व्यवस्थापक, (साखर कारखाना कर्ज वाटप विभाग), सचिन डोंडकर, निरीक्षक (साखर कारखाना कर्ज वाटप विभाग) अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
KDCC ED Action : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पाच अधिकारी ईडीच्या ताब्यात; महत्वाची कागदपत्रे जप्त
दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ईडीने छापा टाकून तपासणी सुरू केली होती. आज ईडीच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागल्याने बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. शिवाय काही कागदपत्रेही जप्त केली आहेत. मात्र या अधिकाऱ्यांना नेमके कशासाठी ताब्यात घेतले आहे हे देखील स्पष्ट झाले नाही. त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्याचे या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा विरोध :आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी झाल्यानंतर एकूण पाच अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतला आहे. कारवाई झाल्यानंतर संबंधितांना घेऊन जात असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या अधिकाऱ्यांकडे आता ईडीचे अधिकारी काय चौकशी करणार हे देखील पहावे लागणार आहे.
अधिकाऱ्यांकडून दोन दिवस तपासणी :काल बुधवार एक फेब्रुवारी रोजी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेवरती धाड टाकली होती. अथणी आणि गडहिंग्लज येथील बँकेच्या शाखेवरती सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापा टाकला होता. काल सकाळपासून रात्री उशिरा बारापर्यंत ईडीच्या अधिकारी बँकेत विविध कागदपत्रांची तपासणी करत होते. रात्री बारा वाजता कारवाई थांबवल्यानंतर आज गुरुवार 2 फेब्रुवारी रोजी सुद्धा सकाळी ईडी अधिकारी बँकेत दाखल झाले. आज सुद्धा दिवसभर विविध कागदपत्रांची त्यांनी तपासणी केली. सायंकाळी सहाच्या सुमारास महत्त्वाच्या कागदपत्रांसह बँकेच्या पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. यांच्याकडून आता काय माहिती मिळणार पहावा लागणार आहे.
हेही वाचा -Sudhakar Adbale Wins : गडकरी फडणवीसांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबालेंचा दणदणीत विजय