कोल्हापूर :गायरान जमिनीवरील अतिक्रमण (Gayran land encroachment) काढण्यावरून कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय महामोर्चाची घोषणा करण्यात आल्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद (Minister Chandrakant Patil press conference Kolhapur) घेत आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गायरानवरील अतिक्रमण काढून घेण्याचा निर्णय Decision to remove encroachment on Gayran land न्यायालयाने दिला असून व्यक्तिगत कामासाठी गायरान वापरू नये असा कायदा आहे.
Chandrakant Patil : गायरान जमिनीवरील अतिक्रमणबाबत लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार: मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : गायरान जमिनीवरील अतिक्रमण (Gayran land encroachment) काढण्यावरून कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय महामोर्चाची घोषणा करण्यात आल्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद (Minister Chandrakant Patil press conference Kolhapur) घेत आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गायरानवरील अतिक्रमण काढून घेण्याचा निर्णय Decision to remove encroachment on Gayran land न्यायालयाने दिला असून व्यक्तिगत कामासाठी गायरान वापरू नये असा कायदा आहे.
हा लोकांना उकसवण्याचा प्रकार- चंद्रकांत पाटील
मात्र, महाविकास आघाडीतील नेते ही अतिक्रमण काढू देणार नसल्याचे म्हणत असून हा लोकांना उकसवण्याचा हा प्रकार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे तसेच व्यक्तीगत आपलाही अतिक्रमण काढण्याला विरोध असल्याचेही ते म्हणाले. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते
मंत्री पाटील यांची भूमिका-कायद्यामध्ये बदल करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार आहे. त्वरित अतिक्रमण काढू नये असे विनंतीही करणार आहे आणि सरकार याबाबत लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.