कोल्हापूर - वारंवार टाळेबंदीची अफवा व अनेक कारणांमुळे बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर पडले आहेत. त्याचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यालाही याचा फटका बसला आहे. आपल्या अर्धा एकर क्षेत्रातील कोबीला केलेला लागवड खर्चही मिळत नसल्याने त्यांनी शेवटी सगळ्या कोबीवर विळा चालवला.
लागवड खर्चही मिळेना
शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील बाबासो कुग्गे यांनी आपल्या अर्धा एकर क्षेत्रात कोबी लावला होता. पीकही अतिशय चांगल्या पद्धतीने आले. मात्र, आता कोल्हापूरसह राज्यभरातील बाजारपेठांत कोबीचे दर इतके पडले आहेत त्यामुळे त्यांना त्यातून लागवड खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जतन केलेल्या कोबीला काढून टाकावे लागले. यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.