कोल्हापूर:कोल्हापुरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयाबाहेरस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने राजु शेट्टी यांनी आंदोलन स्थळीच महाशिवरात्रीची पूजा केली.गेल्या आठ दिवसापासून हे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना दिवसाला 10 ते 12 तास वीज द्यावी या सह अन्य मागण्या आहेत.
Raju Shetty Vs Government : आकडेवारीसह स्पष्टीकरण द्या महाराष्ट्राला कळेल चोर कोण आहे - राजु शेट्टी
राज्याचे मंत्री हे राज्याचे राहिले नसून त्यांच्या जिल्ह्याचे (Minister of State became District) झाले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) हे ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात तेथे वीज चोरी आणि थकबाकी जास्त का. त्यांनी नुसत्या वल्गना करण्यापेक्षा 21 रुपये दराने वीज खरेदी करून कोणाच्या घशात पैसे घातले जात आहेत. याचे आकडेवारीसह स्पष्टीकरण द्यावे. म्हणजे महाराष्ट्राला कळेल कोण चोर आहे ते (Maharashtra will know who the thief is) अशी आव्हान स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetty of Swabhimani Shetkari Sanghatana) यांनी केले आहे.
राज्याचे मंत्री हे राज्याचे राहिले नसून त्यांच्या जिल्ह्याचे झाले आहेत नितीन राऊत हे ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात त्या जिल्ह्यात वीज चोरी आणि थकबाकी एवढी जास्त का असा सवाल त्यांनी विचारला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत नुसत्या वल्गना करण्यापेक्षा 21 रुपये दराने वीज खरेदी करून कोणाच्या घशात पैसे घालत आहे आणि कोणत्या कंपनी कडून वीज खरेदी करत आहे याच्या आकडेवारीसह स्पष्टीकरण द्यावे. म्हणजे महाराष्ट्राला कळेल कोण चोर आहे अशी टीका राजू शेट्टी यांनी यावेळी केली आहे.