महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आंदोलक लवकरच गुन्हे मुक्त होतील - चंद्रकांत पाटील

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याच्या निर्णयानंतर कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहात कृतज्ञता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लवकरच मराठा आंदोलक गुन्हे मुक्त होतील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील

By

Published : Jul 7, 2019, 10:35 PM IST

कोल्हापूर - मराठा आरक्षण आंदोलनावेळी दाखल झालेले आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची सुरुवात झाली आहे. ५ लाख रुपयांच्या आतील नुकसानी संदर्भातील गुन्हे मागे घेण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करत आहे. त्यामुळे लवकरच मराठा आंदोलक गुन्हे मुक्त होतील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते कोल्हापुरात बोलत होते.

चंद्रकांत पाटील

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याच्या निर्णयानंतर कोल्हापूरात सकल मराठा समाजाच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहात कृतज्ञता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कृतज्ञता सत्कार समारंभाला महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनावेळी दाखल झालेले आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची सुरुवात झाली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details