महाराष्ट्र

maharashtra

कोल्हापूरकरांचे अनोखे आंदोलन, रस्त्यावरील खड्ड्यांचा साजरा केला वाढदिवस

कोल्हापूर येथे नागरिकांनी स्त्यावरील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत अनोखे आंदोलन केले. पावसामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या रस्तेबांधणीमुळे रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिक झाले त्रस्त झाले आहेत.

By

Published : Dec 13, 2019, 7:29 PM IST

Published : Dec 13, 2019, 7:29 PM IST

agitators celebrated the birthday of road potholes at kolhapur
कोल्हापूरमध्ये आंदोलकांनी रस्त्यांच्या खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला

कोल्हापूर -कोल्हापूरकरांनी शुक्रवारी अगदी अनोखे आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्यांच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या कोल्हापूरच्या नागरिकांनी चक्क खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. तसेच महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

कोल्हापूरकरांचे अनोखे आंदोलन

हेही वाचा.. अधिकृत घोषणा: 'उरी' नंतर 'बालाकोट एअरस्ट्राईक'वर येणार चित्रपट

पावसामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या रस्तेबांधणीमुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे शहरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ नागरिकांनी चक्क खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत प्रशासनाचा निषेध केला. शहरातील गंगावेश परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र, त्याकडे महापालिकेने अद्याप लक्ष दिले नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. याच्याच निषेधार्थ खड्ड्याभोवती रांगोळी काढून त्यांचा वाढदिवस साजरा करत अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनेक वाहनधारक उत्साहाने सहभागी झाले होते.

हेही वाचा... #PlasticFreeIndia: पानांचे द्रोण ठरत आहेत प्लास्टिकमुक्त भारतासाठी वरदान !

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details