महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 28, 2021, 8:32 PM IST

ETV Bharat / state

अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत जाहीर

अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टकडून पूरग्रस्तांना घरबांधणीसाठी 10 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Deepali Bhosale Syed Charitable Trust help
दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट

कोल्हापूर -अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टकडून पूरग्रस्तांना घरबांधणीसाठी 10 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पूरस्थिती पाहणी दरम्यान दिपाली सय्यद यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली असून यातून नागरिकांच्या पडलेल्या घरांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हंटले.

माहिती देताना अभिनेत्री दिपाली सय्यद

हेही वाचा -महापुराचा फटका : पोल्ट्रीत पाणी शिरल्याने 3500 पक्ष्यांचा मृत्यू; चंदगड तालुक्यातील घटना

दिपाली यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी, कुर भागात पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. ही मदत कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आदी पूरग्रस्त भागातील लोकांच्या पुनर्वसनसाठी असणार असल्याचेही त्यांनी म्हंटले. दरम्यान, दिपाली चॅरिटेबल ट्रस्टकडून एवढ्या मोठ्या मदतीमुळे अनेकांना पुन्हा एकदा हक्काचा निवारा मिळणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मदत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्तांना मदतरुपी शुभेच्छा द्याव्या, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण आपल्या दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ज्यांची घरे पडली आहेत त्यांच्यासाठी 10 कोटींच्या मदतीच्या माध्यमातून घरे बांधून देणार असल्याचेही त्यांनी माहिती दिली.

2019 च्या महापुरातसुद्धा ट्रस्टकडून मदत

दरम्यान, 2019 च्या महापुरातसुद्धा दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टकडून मोठी मदत करण्यात आली होती. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, हीच भावना ठेवून दीपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट काम करत असून यापुढेही आमच्या हातून अशी कामे होत राहणार असल्याचे त्यांनी नागरिकांशी बोलताना म्हंटले. शिवाय त्यांनी पूरस्थितीची पाहणी करून, सर्वांनी धीर धरा, आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत, अशी भावाना व्यक्त केली.

हेही वाचा -Kolhapur Flood: पूरग्रस्त व्यवसायिकांची एकच मागणी, सरकारने मदत करावी

ABOUT THE AUTHOR

...view details