कोल्हापूर - जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इचलकरंजी येथील 60 वर्षाच्या कोरोनाबधित रुग्णाच्या 4 वर्षांच्या नातवालासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा रुग्णाचे अहवाल इचलकरंजी येथील आयजीएम रूग्णालयाला प्राप्त झाले आहेत.
इचलकरंजीत आणखी एक पॉझिटिव्ह, कोरोनाबाधिताच्या नातवालाही लागण
सोमवारी सकाळी इचलकरंजी येथील एका 60 वर्षांच्या रुग्णाला लागण झाल्याचे समजताच त्यांच्या इतर कुटुंबाचेसुद्धा स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. यातून त्या व्यक्तीच्या 4 वर्षांच्या नातवालासुद्धा कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. इचलकरंजीतील रुग्णांची संख्या आता दोन झाली आहे
इचलकरंजीतील रुग्णांची संख्या आता दोन झाली आहे. लहान मुलाला कोरोनाची लागण झाल्याची ही पहिलीच घटना कोल्हापुरात घडली असल्याने आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. सोमवारी सकाळी इचलकरंजी येथील एका 60 वर्षांच्या रुग्णाला लागण झाल्याचे समजताच त्यांच्या इतर कुटुंबाचेसुद्धा स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. यातून त्या व्यक्तीच्या 4 वर्षांच्या नातवालासुद्धा कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. दिलासादायक बाब म्हणजे त्यांच्या 15 वर्षांच्या दुसऱ्या एका नातवाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर, त्यांच्या पत्नी आणि अन्य दोघांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही.