महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आम्ही आधीपासून हिंदूच, कथित धर्मांतर करणाऱ्या कुटुंबाकडून स्पष्टीकरण

आम्ही कोणतेही धर्मांतर केलेले नसून पैठणमध्ये देवदर्शनासाठी गेलो होतो, अशी प्रतिक्रिया पैठण येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबीयांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी एक ख्रिश्चन कुटुंब धर्मांतर करुन पुन्हा हिंदू धर्म स्वीकारल्याची चर्चा सुरू होती. संबंधित कुटुंब ख्रिश्चन नसल्याचा दावा अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केला होता. त्यांनतर आता ते कुटुंब समोर येत आम्ही हिंदू धर्मिय असून आम्ही धर्मांतर केला नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Dec 28, 2021, 9:17 PM IST

जालना -आम्ही कोणतेही धर्मांतर केलेले नसून पैठणमध्ये देवदर्शनासाठी गेलो होतो. तिथे फक्त आमचा सत्कार झाला. आम्ही हिंदू धर्मीयच आहोत. आम्ही धर्मांतर केलेले नाही, धर्म आधीही बदलेला नव्हता आणि कधी बदलणारही नाही, अशी प्रतिक्रिया पैठणमध्ये धर्मांतराची चर्चा झालेल्या नागरीकांनी दिली आहे.

बोलताना अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष व ते कुटुंबीय

नाव न सांगण्याच्या अटीवर ते म्हणाले, आम्ही एकाच कुटुंबातील 14 जण फक्त देवदर्शनासाठी पैठणमध्ये गेलो होते. संत एकनाथ मंदिरात येणाऱ्या सर्वांचा सत्कार होत असेल म्हणून आमचा सत्कार झाला असावा, असे आम्हाला वाटले, असेही त्यांनी सांगितले.

पैठणमध्ये धर्मांतर झालेले लोक ख्रिश्चन नाहीच - आशिष शिंदे यांची मागणी

जालना जिल्ह्यातील मंठ्यातील 12 कुटुंबातील 53 महिला-पुरुषांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून पैठणच्या संत एकनाथ मंदीरात हिंदुधर्म स्विकारल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, पैठणमध्ये ज्यांचे धर्मांतर करण्यात आले ते ख्रिश्चन नव्हते. ख्रिश्चन समाजाला विनाकारण बदनाम केले जाते असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केली. त्यानंतर ते कुटुंबीय समोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा -जालना : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत पंतप्रधानांनी केलेल्या निर्णयाचे स्वागत - राजेश टोपे

ABOUT THE AUTHOR

...view details