जालना- देवाचा गजर करत अगदी प्रात:काळी ग्रामीण भागात घरोघरी वासुदेव यायचे. मात्र, पूर्वीपासून चालत आलेली लोककला जपणारा वासुदेव काळाच्या ओघात लोप पावत आहे. मात्र, तुळजापुरातील एक वासुदेवाचे कुटुंब जालन्यात वास्तव्यास आले आहे. ते आजही परंपरेनुसार जालन्यात वासुदेव बनून फिरत आहे.
वासुदेव आला रे वासुदेव आला... जालन्यात आजही सकाळी येतो 'वासुदेव'
पहाटे उठल्यानंतर घरोघरी जाऊन त्या घरातील स्वर्गवासी ज्येष्ठांच्या नावाचा उद्धार करुन देवाकडे त्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आशीर्वाद वासुदेव मागतात. ते देवाचा गजर करतात.
हेही वाचा-पूर्व वैमनस्यातून युवकावर तलवारीने वार; तीन आरोपी अटकेत, एक फरार
पहाटे उठल्यानंतर घरोघरी जाऊन त्या घरातील स्वर्गवासी ज्येष्ठांच्या नावाचा उद्धार करुन देवाकडे त्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आशीर्वाद वासुदेव मागतात. ते देवाचा गजर करतात. या वासुदेवाची कौटुंबिक परिस्थिती पाहता केवळ चौथीपर्यंतच शिक्षण घेऊन कशीबशी आकडेमोड शिकले आहेत. केवळ पंधरा सोळा वर्षाचे वय आणि त्यामध्ये कुटुंबाचे पडलेली जबाबदारी यामध्ये शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळच मिळाला नाही. मात्र, आज तंत्रज्ञानाच्या युगात धावपळ करणाऱ्या जीवनशैलीत आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा वासुदेवकी करत पुढे नेण्याचे काम करत आहेत.