महाराष्ट्र

maharashtra

राजीव सातवांच्या जाण्याने मनाला अत्यंत वेदना झाल्या - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदार राजीव सातव यांना श्रध्दांजली वाहिली आहे. 'राजीव सातव यांच्या जाण्याने केवळ काँग्रेस पक्षाचीच हानी झाली असे नाही, तर आमच्या मित्रपरिवाराचीही फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे', असे दानवेंनी म्हटले आहे.

By

Published : May 16, 2021, 5:19 PM IST

Published : May 16, 2021, 5:19 PM IST

Updated : May 16, 2021, 7:51 PM IST

JALNA
जालना

भोकरदन (जालना) - काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. राजीव सातव यांच्या जाण्याने मनाला अत्यंत वेदना झाल्या आहेत. मित्रपरिवाराची हानी झाली आहे, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

राजीव सातवांच्या जाण्याने मनाला अत्यंत वेदना झाल्या - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

'राजीव सातव यांच्या जाण्याने केवळ काँग्रेस पक्षाचीच हानी झाली असे नाही, तर आमच्या मित्रपरिवाराचीही फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ते दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो. मी व माझ्या कुटुंबाच्या वतीने राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करतो', असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, प्रवीण दरेकर, राज्यमंत्री बच्चू कडू, काँग्रेस नेते सचिन सावंत, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळे, मल्लिकार्जून खरगे, शरद पवार, राहुल गांधी, विश्वजित कदम, प्रियांका गांधी, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री नवाब मलिक आदींनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा -हळदीच्या कार्यक्रमात तुफान राडा, गवाकऱ्यांची फ्री स्टाइल हाणामारी

Last Updated : May 16, 2021, 7:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details