जालना -राजुरेश्वराचे मंदिर सात तारखेपासून खुले होणार आहे. त्यानिमित्ताने मंदिर प्रशासनाकडून मंदिर परिसर स्वच्छ व सॅनिटाझ करण्याचे काम सुरू आहे.
राजुरेश्वराचे मंदिर होणार खुले, प्रशासनाकडून मंदिर परिसरात स्वच्छतेचे काम सुरू राजुरेश्वर मंदिर परिसर स्वच्छतेचे काम सुरू -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून मंदिरे ही बंद होती. मात्र, सरकारने आता मंदिरे उडण्यासाठी परवानगी दिली आहे. मराठवाड्याचे आराध्यदैवत असलेल्या श्री राजुरेश्वराचे मंदिर ही महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आदेशानुसार सात तारखेपासून उघडण्यात येणार आहे. त्यानुसार मंदिर प्रशासनच्यावतीने मंदिर परिसर संपूर्णपणे स्वच्छ व सॅनिटाझ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
विना मास्क आढळल्यास दोनशे रुपये दंड -
सात तारखेपासून हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. शासनाच्या नियमावलीप्रमाणे कोरोनाच्या दोन डोस घेतलेल्या भाविकांच प्रवेश दिला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आजारी व्यक्ती यांना मात्र प्रवेश देण्यात येणार नसल्याची माहिती मंदिर प्रशासनच्यावतीने देण्यात आली आहे. भाविकांना कोरोनाच्या नियमाचे सक्तीने पालन हे करणे बंधनकारक असणार आहे. त्याच बरोबर मंदिर परिसरात विना मास्क प्रवेश दिला जाणार नसून मास्क न वापरणाऱ्याकडून दोनशे रुपये दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनच्यावतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा -Temples Reopen : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दररोज 10 हजार भाविकांना घेता येणार मुखदर्शन