जालना - एसटी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर अशा अनेक मुद्यावर एसटी कामगार संयुक्त कृती समितीने बुधवारपासून (दि. 27) बेमुदत उपाेषण पुकारले. आज दुसऱ्या दिवशीही (दि. 28) हे उपोषण सुरुच आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील एसटी सेवा कोलमडली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
दुसऱ्या दिवशीही लालपरीचा चक्का जाम प्रवाशांचे मोठे हाल
जिल्ह्यातील जालना, जाफ्राबाद, अंबड आणि परतूर या चारही डेपोतून एकही एसटी बस सकाळपासून बाहेर पडली नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, राज्य सरकार जोपर्यंत मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. एसटी सेवा पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
काय आहे मागणी
- 1 एप्रिल, 2016 पासून शासनप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता लागू करण्यात यावा.
- वार्षिक वेतनवाढीचा दर 3 टक्के प्रमाणे देण्यात यावा.
- घरभाडे भत्ता 8, 16 व 24 टक्क्यांप्रमाणे देण्यात यावे.
- शासनाप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर देऊन थकबाकीची रक्कम एकरकमी दिवाळीपूर्वी देण्यात यावी.
हे ही वाचा -थकीत महागाई भत्ताच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनाकडून 'बेमुदत उपोषण'