महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मोसंबीत अल्पकालीन आंतरपीक घेणे शेतकऱ्यांच्या हिताचे'

आंतरपिकाचा मोसंबी झाडावर विपरीत परिणाम टाळण्यासाठी व जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी कमी कालावधीची आंतरपिके फायदेशीर ठरतात, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

By

Published : Dec 27, 2019, 10:10 AM IST

Mosby
मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांची मोसंबी बागांना दिलेली भेट

जालना- आंतरपिकाचा मोसंबी झाडावर विपरीत परिणाम टाळण्यासाठी व जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी कमी कालावधीची आंतरपिके फायदेशीर ठरतात, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले. बदनापूर तालुक्यातील मौजे सोमठाणा येथे 26 डिसेंबरला प्रक्षेत्र भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत मोसंबी उत्पादक तातेराव कोल्हे, भगवान कोल्हे, शिवाजी कोल्हे, योगेश कोल्हे आदी शेतकरी सहभागी झाले होते.

हेही वाचा -आदिवासी जिल्ह्यात न्युमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी न्युमोकोकल लसीकरणाचा खर्च सिद्धिविनायक न्यास उचलणार

यावेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, बहुतांशी बागांमध्ये मोसंबी झाडाच्या उंचीपेक्षा आंतरपिकांची उंची जास्त दिसून येते. यामुळे विविध किडी आश्रयास येऊन मोसंबीचे अतोनात नुकसान करतात. त्यामुळे झाडांवर सावली पडून मोसंबी पिकाची वाढ खुंटते. तसेच अन्नद्रव्य मिळवण्यासाठी देखील स्पर्धा निर्माण होते. त्यामुळे उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन सरासरी उत्पादन काढणे अवघड होते. त्यामुळे मोसंबी पिकात द्विदलवर्गीय आंतरपिके घेणे फायदेशीर ठरते.

मागील अवकाळी पावसामुळे मोसंबी झाडांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे झाडांवर डिंक येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ताबडतोब डिंक खरडून बोर्डो पेस्ट लावण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details