महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raosaheb Danve : मायचं दूध पिलेले असाल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा; रावसाहेब दानवेंचं खुलं आव्हान

मायचं दूध पिलेलं असेल माझा भ्रष्टाचार काढून दाखवा, असं खुलं आव्हान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) नाव न घेता अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना दिलं आहे.

raosaheb danve critisize arjun khotkar
raosaheb danve critisize arjun khotkar

By

Published : Dec 5, 2021, 5:41 PM IST

Updated : Dec 5, 2021, 6:42 PM IST

जालना-मायचं दूध पिलेलं असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा, असं खुलं आव्हान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी नाव न घेता अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना दिलं आहे. आज रावसाहेब दानवे यांच्याहस्ते जालना नगर परिषदे (Jalna Nagar Parishad) अंतर्गत मंजूर झालेल्या वार्ड क्रमांक 1 आणि 7 मधील सिमेंट रस्त्यांच्या कामांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता अर्जुन खोतकरांना खुले आव्हान

दानवेंनी घेतला खोतकरांचा समाचार -

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी ईडीने छापेमारी केली होती. त्यांनतर खोतकर यांनी दानवे यांच्या सांगण्यावरूनच ही छापेमारी झाली असून दानवे यांनी रस्त्याच्या कामात घोटाळे केल्याचा आरोप करत त्यांचे घोटाळे उघड करण्याचा ईशारा दिला होता. त्यावरून आज दानवे यांनी खोतकर यांचा समाचार घेतला. आजच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंटयाल, नगराध्यक्षा संगीता गोरंटयाल यांचीही उपस्थिती होती.

तर आणखी एखादी टीम घरी येईल -

एका 400 लोकसंख्या असलेल्या गावातून येऊन आपण केंद्रीय मंत्रीपदापर्यंत खूप मोठी झेप घेतली असून लोक माझ्यावर जसे आरोप करतात तसा आणखी मी माझ्या राजकीय आयुष्यात आणखी मोठा होत चाललो, असं सांगत आता मी चिडचिड करणार नाही, कुणावरही आरोप करणार नाही, असा टोलाही त्यांनी खोतकरांना लगावला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाचं काम करत असलेल्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांची यादी असून गडकरी यांनी या यादीतील नावं जाहीर करावीत. या यादीतील नावं गडकरी यांनी जाहीर केल्यास आणखी एखादी टीम घरी येईल, असा टोला काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनी अर्जुन खोतकर यांचं नाव न घेता मारला. जालनेकरांची ऊंची ही कॉन्ट्रॅक्टरच्या डोक्याला बंदूक लाऊन वसुली करण्याची आहे, असा आरोप गोरंटयाल यांनी नाव न घेता खोतकरांवर केला.

हेही वाचा -ST Bus Strike : संपामुळे एसटी महामंडळाने सुरु केली नोकर भरती; प्रतीक्षा यादीवरील 50 उमेदवारांना घेतले नोकरीत

Last Updated : Dec 5, 2021, 6:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details