महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हो मी शिवसेनेचा बंडखोर - राजू अहिरे

परंपरेनुसार बदनापूर मतदारसंघ शिवसेनेसाठी न सोडल्याने मी बंडखोरी केली, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजू अहिरे यांनी दिली. राजू अहिरे यांनी शुक्रवारी बदनापूर शहरातून वाजत-गाजत रॅली काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजू अहिरे

By

Published : Oct 4, 2019, 7:43 PM IST

Updated : Oct 5, 2019, 7:57 AM IST

जालना -बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार नारायण कुचे येथून निवडून आले. परंपरेनुसार हा मतदारसंघ शिवसेनेसाठी न सोडल्याने मी बंडखोरी केली, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजू अहिरे यांनी दिली.

बदनापूर मतदारसंघ शिवसेनेसाठी न सोडल्याने मी बंडखोरी केली - राजू अहिरे

राजू अहिरे यांनी शुक्रवारी बदनापूर शहरातून वाजत-गाजत रॅली काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मागील 25 वर्षांपासून या मतदारसंघावर शिवसेनेची पकड आहे. मात्र, 2014 मध्ये युती न झाल्याने हा मतदारसंघ भाजपकडे गेला.

हेही वाचा - जालन्यातून कैलास गोरंट्याल तर परतूरमधून बबनराव लोणीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

या निवडणुकीसाठी युती झाली आहे. त्यामुळे बदनापूर मतदारसंघ पुन्हा शिवसेनेला मिळावा, अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा होती. भाजपकडेच हा मतदारसंघ राहिल्याने सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. भोकरदन तालुक्यातील 62 गावे, 5 जिल्हा परिषद सदस्य आणि 6 पंचायत समिती सदस्य बदनापूर मतदार संघात येतात. यातील 62 गावांचे नेतृत्व राजू अहिरे करत आहेत. त्यामुळे त्यांचे बंड थंड करण्यामध्ये आमदार नारायण कुचे यशस्वी झाले नाही, तर या बंडाचा फटका त्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Last Updated : Oct 5, 2019, 7:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details