जालना-रुग्णालयात तपासण्यासाठी नेलेल्या गर्भवती महिलेचा व तिच्यासह दुचाकीवरून घरी परतणाऱ्या पतीचा अपघातात मृत्यू झाला. भरधाव वेगातील टिप्परने दुचाकीला समोरून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात शहरापासून आठ किमी अंतरावर असलेल्या लक्ष्मी एग्रोटेक कंपनीसमोर घडला आहे. योगेश गणेश बोडके (२५) व त्यांची पत्नी गीता अशी अपघातामधील मृतांची नावे आहेत.
टिप्परची दुचाकीला धडक ; पतीसह गर्भवती महिलेचा मृत्यू
भोकरदन तालुक्यातील जानेफळ मिसाळ येथील योगेश बोडके हे गर्भवती पत्नीला तपासण्यासाठी जालन्यात आले होते. त्यानंतर ते पत्नीसह दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत होते. जालन्यापासून आठ किलोमीटरवर असलेल्या लक्ष्मी अॅग्रोटेक कंपनीसमोर ते पोहोचले असताना विरुद्घ दिशेने येणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
भोकरदन तालुक्यातील जानेफळ मिसाळ येथील योगेश बोडके हे गर्भवती पत्नीला तपासण्यासाठी जालन्यात आले होते. त्यानंतर ते पत्नीसह दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत होते. जालन्यापासून आठ किलोमीटरवर असलेल्या लक्ष्मी अॅग्रोटेक कंपनीसमोर ते पोहोचले असताना विरुद्घ दिशेने येणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीला धडक दिल्यानंतर टिप्पर थेट लक्ष्मी एग्रोटेकची संरक्षण भिंत तोडून आत घुसले. या अपघातात टिप्परचा चालक किरकोळ जखमी झाला. त्याने दिलेल्या माहितीवरून टिप्पर हे राणा ठाकूर यांचे असल्याचे समजते.
अपघातात योगेश गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमेतून अतिरक्तस्त्राव आणि जोरदार मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी गीता यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचाही थोड्याच वेळात मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पतीसह गर्भवती पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याने जानेफळ मिसाळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.