महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन शहरात पोलिसांचे पथसंचलन

21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आहे. सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत भाजप शिवसेना महायुती, काँग्रेस राष्ट्रवादी  आघाडी, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

police-paroling-in-bhokardan
भोकरदन शहरात पोलिसांचे पथसंचलन

By

Published : Oct 13, 2019, 6:35 PM IST

Updated : Dec 18, 2019, 12:11 PM IST

जालना - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शहरात पथसंचलन करण्यात आले. रविवार 13 ऑक्टोबरला शहरातील सराफा मार्केट, महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी महाराज चौक, जालना रोड या भागात पोलिसांनी पथसंचलन केले.

भोकरदन शहरात पोलिसांचे पथसंचलन

हेही वाचा -जालन्यात नेत्र व अवयव दान अभियानानिमित्त रॅली

21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असून सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत भाजप शिवसेना महायुती, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. दरम्यान, प्रशासकीय पातळीवर निवडणूकीची तयारी सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून पोलीस प्रशासन ही कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी सतर्क आहे.

Last Updated : Dec 18, 2019, 12:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details