जालना -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत विविध पदांची भरती सुरू आहे. काही महत्त्वांच्या पदासाठी काही उमेदवारच मिळालेले नसल्याची बाब काल (शुक्रवारी) झालेल्या मुलाखतींमधून पुढे आली आहे. खरेतर या मुलाखतीची तारीख 31 ऑगस्टला संपली होती. मात्र, त्यानंतर उमेदवारांच्या अर्जांची छाननी आणि त्यांची क्रमवारी लावण्यामध्ये वेळ गेला आणि गुरुवार आणि शुक्रवारी या मुलाखती पार पडल्या.
जालन्यात आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये महत्वांच्या पदाकडे उमेदवारांची पाठ
महत्वांच्या पदांसाठी उमेदवारांचे अर्ज आले नाहीत तर जनरल टेक्निशियन या पदासाठी एकमेव अर्ज आला आणि त्यांची नियुक्ती झाली. दरम्यान आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातून भरण्यात येणाऱ्या समुपदेशक पदांसाठी सहा उमेदवार पात्र ठरले होते. मात्र, अनावधानाने यांच्या मुलाखती घेणे राहून गेल्याने सायंकाळी साडेसहा वाजता निमा अरोरा यांच्या दालनात या मुलाखती झाल्या.
या मुलाखतीमध्ये मानसशास्त्रज्ञ, फिजिओथेरपी, जनरल टेक्निशियन, सिटीस्कॅन टेक्नॉलॉजी, सोशल वर्कर, मानसोपचार तज्ञ परिचारिका आदी पदांसाठी या मुलाखती झाल्या. त्यामध्ये फिजिओथेरपी, डेंटल व्हायजेलिटी, मानसोपचार तज्ज्ञ परिचारिका, या प्रत्येकी तिन्ही पदांसाठी उमेदवारांचे अर्ज आले नाहीत. त्यामुळे ही पदे सोडून उर्वरित पदांसाठी जिल्हापरिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहांमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विवेक खतगावकर निवड समितीचे सचिव बालासाहेब शेळके, आणि डॉ. मुंडे यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
महत्वांच्या पदांसाठी उमेदवारांचे अर्ज आले नाहीत तर जनरल टेक्निशियन या पदासाठी एकमेव अर्ज आला आणि त्यांची नियुक्ती झाली. दरम्यान आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातून भरण्यात येणाऱ्या समुपदेशक पदांसाठी सहा उमेदवार पात्र ठरले होते. मात्र, अनावधानाने यांच्या मुलाखती घेणे राहून गेल्याने सायंकाळी साडेसहा वाजता निमा अरोरा यांच्या दालनात या मुलाखती झाल्या. त्यातून एका उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. दरम्यान ही भरती 31 ऑगस्टला होणे अपेक्षित असताना उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यासाठी वेळ लागला आणि ही भरती प्रक्रिया नेहमीच सुरू असते त्यामुळे तिला वेळेचे बंधन नसल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी दिली.