महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 22, 2020, 3:28 PM IST

ETV Bharat / state

धनगर समाजाचा अनुसूचित प्रवर्गात समावेश करावा; जालना ते औरंगाबाद मानवी साखळी आंदोलन

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून त्यांना सवलती देण्यात याव्या, यासाठी अनेक दिवसांपासून समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. वारंवार आंदोलने करूनही मागणी मान्य होत नसल्यामुळे धनगर समाजात असंतोष धुमसत आहे.

बदनापूर
बदनापूर

बदनापूर (जालना) - धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी औरंगाबाद ते जालना मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले. तत्काळ धनगर समाजाच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून त्यांना सवलती देण्यात याव्या, यासाठी अनेक दिवसांपासून समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. वारंवार आंदोलने करूनही मागणी मान्य होत नसल्यामुळे धनगर समाजात असंतोष धुमसत आहे. मागील पाच वर्षापूर्वी भाजपच्या वतीने तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त0त्काळ निकाली काढण्याचे आश्वासन समाजाला दिले होते. असे असताना ते न पाळता समाजाला पाच वर्ष झुलवत ठेवण्याचे काम केल्यामुळे नवीन आलेल्या सरकारकडून धनगर समाजाला मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, जवळपास १० महिने होऊनही हे सरकार समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत असल्यामुळे मल्हार सेनेच्या वतीने विविध आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. त्या अनुषंगानेच केंद्र व राज्य सरकारपर्यंत समाजाचा आवाज जावा म्हणून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानापासून राज्य सरकारचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या औरंगाबाद येथील निवासस्थानापर्यंत जालना ते औरंगाबाद महामार्गावर मानवी साखळी करून अभिनव आंदोलन करण्यात आले.

बदनापूर शहरात व जेथे लोकवसाहत, चौक आहेत त्या ठिकाणी समाजाच्या वतीने पिवळे झेंडे घेऊन मानवी साखळी तयार करण्यात येऊन या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत दोन्ही सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी लहु शेवाळे, विठ्ठल रांधवन, पांडुरंग कोल्हे, कैलास चोरमारे, बजरंग वैद्य, धनराज सातपुते, गणेश कोल्हे, दादाराव गायके, रघुनाथ होळकर, मच्छिंद्र होळकर, कारभारी डवणे, रावसाहेब गाडेकर, अंकुश खेडकर, रमेश सोरमारे, भाऊसाहेब गाढे, सोपान भांड, जनार्धन सोरमारे, बाबासाहेब बनसोड, भिमराव बोंद्रे, विष्णू कानुले, रामनारायण कोल्हे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. मानवी साखळी आंदोलन केल्यानंतर बदनापूर तहसीलदारांना या बाबत शासनाला आरक्षणाचा लाभ देण्याबाबत निवेदनही देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details