महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोस्त दोस्त ना रहा ! पैशासाठी मित्राचा खून, ४ तासात आरोपी अटकेत

जुना जालना परिसरात कुंडलिका नदीच्या काठालगत असलेल्या किल्ला जिनिंग भागात एका २२ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ४ तासांत शोधून काढले.

By

Published : Apr 25, 2019, 11:58 PM IST

दोस्त दोस्त ना रहा ! पैशासाठी मित्राचा खून, ४ तासात अरोपी अटकेत

जालना- जुना जालना परिसरात कुंडलिका नदीच्या काठालगत असलेल्या किल्ला जिनिंग भागात एका २२ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना घडली होती. ही घटना आज (गुरुवारी) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. कुमार शरदचंन्द्र झुंजूर (२२) असे या खून झालेल्या तरुणाचे नाव होते. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ४ तासांत शोधून काढले.

याप्रकरणी पोलिसांनी विजय तुळशीराम मुंगसे (मस्तगड भाग, मल्लाव गल्ली ) याला ताब्यात घेतले आहे. आपणच खून केला असल्याची कबुलीही विजयने दिली आहे.

सकाळी खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गौर, यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि मिळालेल्या माहितीवरून मल्लाव गल्लीत राहणाऱ्या तुळशीराम मुंगसे या युवकाने हा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

विजयने सांगितले, काही दिवसांपूर्वी मी १ लाख २० हजार रुपये कुमार झुंजूरकडे १ दिवस ठेवण्यासाठी दिले होते. त्यानंतर त्याला पैसे मागितल्यानंतर सदरील पिशवी घरच्यांनी कुठेतरी फेकून दिली आहे, असे सांगून तो वारंवार पैसे देण्याचे टाळत होता. मी नेहमीच पैशाची मागणी केली, मात्र प्रत्येकवेळी कारणे सांगून पैसे देण्याचे टाळत होता. त्यामुळे मस्तंगडवर बोलावले त्यावेळीही त्याने पैसे देण्याचे टाळले. त्यामुळे माझा राग अनावर झाला आणि तो पुढे चालत असताना बाजूला पडलेल्या बांबूने त्याच्यावर मी २ वार केले. त्यामुळे तो जमिनीवर पडला, त्यानंतर माझ्या कमरेला असलेल्या चाकूने मी त्याच्यावर वार केले.

ABOUT THE AUTHOR

...view details