महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फुलांना गिऱ्हाईक नसल्यामुळे शेतकऱ्याने फिरवला फुलशेतीवर नांगर

कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असल्‍याने फुलांची विक्री थांबली आहे. यामुळे अनेक शेतात फुले तोडणीअभावी शेत रंगीबेरंगी झाले आहे. विक्रीच होत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

flowers farm loss
फुलांना गिऱ्हाईक नसल्यामुळे शेतकऱ्याने फिरवला फुलशेतीवर नांगर

By

Published : Apr 8, 2020, 4:50 PM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील फुलांची विक्री बुलडाणा, जळगाव, भुसावळ, पुणे आदी ठिकाणी होते. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्‍पन्नही मिळते. मात्र, संचारबंदी सुरू असल्यामुळे बाजारपेठा बंद आहेत. परिणामी फुलांची विक्री थांबली आहे. अनेक शेतात फुले डौलत आहेत. मात्र, आता शेतकऱ्यांवर नाईलाजास्तव फुलांवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.

वालसावंगीत अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने झेंडू, गुलाब, शेवंती आदींची फुलशेती केली होती. मात्र कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर मागील वीस दिवसांपासून फुलांची विक्री बंद आहे. शेतकऱ्यांनी सण-उत्सव, लग्नसराईमुळे फुलशेतीला प्राधान्य दिले. परिसरातील फुलांची विक्री बुलडाणा, जळगाव, भुसावळ, पुणे आदी ठिकाणी विक्री होते. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्‍पन्नही मिळते.

कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असल्‍याने फुलांची विक्री थांबली आहे. यामुळे अनेक शेतात फुले तोडणीअभावी शेत रंगीबेरंगी झाले आहे. विक्रीच होत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही. पुढील काही दिवस हीच परिस्थिती असल्याने नाइलाजाने शेतकऱ्यांना बहरलेल्या फुलशेतीवर जड मनाने नागर फिरवावा लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details