महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 7, 2021, 9:27 PM IST

Updated : Feb 7, 2021, 9:41 PM IST

ETV Bharat / state

व्हॉट्सअ‌ॅपवर राष्ट्रीय आणि धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट, ग्रुप अ‌ॅडमिनला अटक

व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपवर दोन समाजात तेढ निर्माण करणारी तसेच राष्ट्रीय भावना दुखावणारी पोस्ट टाकणाऱ्या एका व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपच्या अ‌ॅडमिनला अटक करण्यात आली आहे. यू लाईक या नावाने हा ग्रुप चालत होता. या ग्रुपवर आलेल्या पोस्ट संदर्भात आज दुपारी मस्तगड परिसरात चर्चा सुरू झाली आणि याची माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली.

WhatsApp, group admin arrested in jalna
WhatsApp, group admin arrested in jalna

जालना - व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपवर दोन समाजात तेढ निर्माण करणारी तसेच राष्ट्रीय भावना दुखावणारी पोस्ट टाकणाऱ्या एका व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपच्या अ‌ॅडमिनला अटक करण्यात आली आहे.

काय आहे पोस्ट?
भारताच्या राष्ट्रध्वजासोबत अन्य देशाचा राष्ट्रध्वज लावून तसेच अश्लील चित्र दाखवून भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान होईल, असे छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते. एका धर्माच्या देवतांसोबत छेडछाड करुन त्यासंदर्भात देखील चित्रांची तोडफोड करून अश्लील संबंध जोडणारी ही पोस्ट आहे. सदरील पोस्ट एका परदेशातील व्यक्तीने या ग्रुपवर टाकली आहे. मात्र हा ग्रुप चालविणाऱ्या अ‌ॅडमिनला जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली आहे. समीर शब्बीर शेख (वय 38) असे अटक केलेल्याचे नाव असून तो पान टपरी चालवतो. कदीम जालना पोलिसांनी ही कारवाई केली.

माहिती देताना पोलीस अधिकारी

यू लाईक नावाने चालायचा ग्रुप -

यू लाईक या नावाने हा ग्रुप चालत होता. या ग्रुपवर आलेल्या पोस्ट संदर्भात आज दुपारी मस्तगड परिसरात चर्चा सुरू झाली आणि याची माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी सायबर सेलमार्फत या प्रकरणाची अधिक माहिती घेतली आणि रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ग्रुप चालविण्यासाठी वापरण्यात येणारा मोबाईल हस्तगत केला आहे. तसेच आणखी काही अशा आक्षेपार्ह पोस्ट आहेत का? याचाही पोलीस शोध घेत आहेत.

पोस्ट व्हायरल झाल्यावर होता मोठा धोका -
या पोस्टमधील लिहिलेला मजकूर आणि दिसणारी छायाचित्रे व्हायरल झाली असती तर कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला असता, परंतु कदीम जालना पोलिसांनी तातडीने याचे गांभीर्य लक्षात घेऊन ही कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Last Updated : Feb 7, 2021, 9:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details