महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; 'त्या' महिलेचा चौथा अहवाल निगेटिव्ह

आज पाचव्यांदा या कोरोनाग्रस्त महिलेच्या स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. हा अहवाल जर निगेटिव्ह आला तर जालना जिल्हा कोरोनामुक्त होणार आहे.

Fourth report of covid 19 patient is negative in jalna
जालना जिल्ह्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल; 'त्या' महिलेचा चौथा अहवाल निगेटिव्ह

By

Published : Apr 21, 2020, 9:00 PM IST

जालना - जिल्ह्यामध्ये 6 एप्रिल रोजी दुखी नगर भागातील एक 65 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर जालन्यातील नागरिकांनी धास्ती घेतली होती. मात्र, आता या महिलेचा चौथा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे या रुग्णाचा कोरोना मुक्तीकडे प्रवास असल्याचे दिसत आहे.

आज पाचव्यांदा या महिलेच्या स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. हा अहवाल जर निगेटिव्ह आला तर जालना जिल्हा कोरोनामुक्त होणार आहे. प्रशासनाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली नसली तरी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून उद्या महिलेचा निगेटिव्ह अहवाल येईल अशी शक्यताही वर्तविली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details