जालना - किरकोळ खेळण्याच्या कारणावरुन गवळी मोहल्ल्यात दोन गटात हाणामारी झाली. सुरुवातीला सोडवासोडव झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा वाढले आणि रात्री उशिरा चार जणांविरुद्ध कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन गटांमध्ये हाणामारी; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
किरकोळ खेळण्याच्या कारणावरुन गवळी मोहल्ल्यात दोन गटात हाणामारी झाली. सुरुवातीला सोडवासोडव झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा वाढले आणि रात्री उशिरा चार जणांविरुद्ध कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी दुपारी पवन नंदलाल लाड, राहुल नंदलाल लाड, पवन नरेंद्र लाड, नारायण गोगडे यांच्यामध्ये किरकोळ भांडण सुरू होते. हे भांडण सोडवण्यासाठी सुरज लाडचे वडील बालाजी हे नरेंद्रला समजावण्यासाठी गेले. त्यावेळी नरेंद्रने बालाजी यांना धक्काबुक्की करून मारहाण केली. याबाबत सुरज लाड नरेंद्रला विचारणा करायला गेले असता, त्याने सुरजलाही मारहाण केली.
त्यानंतर सुरज लाडने रात्री पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर नरेंद्र भागोजी, शुभम सदाशिव गोगडे, नारायण भागोजी गोगडे, अनील सतकर यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तर, सुरज यांनी दिलेल्या तक्रारीवरून तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदीचा आदेश असताना आणि आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा लागू असतानाही एकत्र जमून मारहाण केल्याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी गवळी मोहल्ल्यात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.