महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्याला बॅंक कर्मचाऱ्याकडून मारहाण, शेतकऱ्यांचे बॅंकेसमोर आंदोलन

पीक कर्ज मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला शहरातील भारतीय स्टेट बॅंकेच्या कर्मचाऱ्याकडून गुरुवारी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेचा राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे. शुक्रवारी या घटनेविरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने बॅंकेसमोर आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांचे बॅंकेसमोर आंदोलन
शेतकऱ्यांचे बॅंकेसमोर आंदोलन

By

Published : Jun 18, 2021, 10:12 PM IST

भोकरदन ( जालना)पीक कर्ज मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला शहरातील भारतीय स्टेट बॅंकेच्या कर्मचाऱ्याकडून गुरुवारी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेचा राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे. शुक्रवारी या घटनेविरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने बॅंकेसमोर आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांचे बॅंकेसमोर आंदोलन

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

यावेळी उपस्थित आंदोलकांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनामध्ये शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देखील शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा -शिवसेनेचा 55वा वर्धापन सोहळा : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी ऑनलाइनच्या माध्यमातून संबोधन

ABOUT THE AUTHOR

...view details