जालना - राज्यात सध्या सर्वत्र भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. जालना नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असून महिलाच नगराध्यक्ष आहेत. अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या पाण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आज मंगळवार २८ मे रोजी काँग्रेसच्या नगरसेविका वाघमारे यांनी प्रभागातील महिलांसह मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला.
पाण्यासाठी नगरसेविकेसह महिलांचा मुख्याधिकारी दालनासमोर ठिय्या
मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला कुलूप असल्यामुळे या महिलांनी १२ वाजल्यापासून दालनासमोर ठिय्या दिला आहे. कुठल्याही परिस्थितीत मुख्याधिकारी येत नाहीत तोपर्यंत दालनासमोरून उठणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी घेतला आहे.
जालना शहरात पाण्यासाठी 'जिसकी लाठी उसकी भैस' अशा पद्धतीचे वातावरण पाण्यासाठी निर्माण झाले आहे. शहराच्या काही भागांमध्ये २४ तास पाणी चालू आहे, तर काही भागांमध्ये एक दिवसाआड पाणी येत आहे, अशा परिस्थितीमध्ये काही असेही भाग आहेत की, तिथे २० दिवसांपासून पाणी नाही त्यातीलच प्रभाग २१ मंगळ बाजार, गुडला गल्ली, कादराबाद या भागात २२ दिवसांपासून पाणी नाही.
नगरपालिकेला वारंवार विनंती करूनही पाणी येण्यास तयार नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी नगरसेविकेचे घर गाठले, आणि नगरसेविकेने सर्व महिलांसह नगरपालिका गाठली. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला कुलूप असल्यामुळे या महिलांनी १२ वाजल्यापासून दालनासमोर ठिय्या दिला आहे. कुठल्याही परिस्थितीत मुख्याधिकारी येत नाहीत तोपर्यंत दालनासमोरून उठणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे नगरसेविकादेखील काँग्रेसच्याच आहेत. काँग्रेसची सत्ता काँग्रेसच्याच नगराध्यक्ष, काँग्रेसच्या नगरसेविका आंदोलन करत असल्यामुळे काँग्रेसला घरचा आहेर मिळाल्याचे बोलले जात आहे.