जालना - भाजपाची जनआशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाववाढ दुप्पट करायला आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. भाजपाने लोकांना फसवले. आता कशाच्या बळावर तुम्ही जन आशीर्वाद यात्रा काढता, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला लगावला. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पटोले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
भाजपाची जन आशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाव दुप्पट करायला आहे का? जातीनिहाय जनगणना काँग्रेसची जूनी मागणी -
लोकांशी खोटं बोलून भाजपाने सत्ता मिळवली आणि महागाई केली. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी ही काँग्रेसची जुनी मागणी आहे. मी विधानसभा अध्यक्ष असताना अध्यक्षाच्या खुर्चीवर बसून ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव पारित करून घेतला, असल्याची आठवण त्यांनी करून दिली. ओबीसी आरक्षण जाण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर बोलताना फसणवीस सरकारने ओबीसींना फसवण्याचे काम केल्याचा पलटवार नाना पटोले यांनी केला.
रावसाहेब दानवेंवर टीका -
अमर, अकबर अँथनीचं हे सरकार आपापसातील भांडणातून पडेल असे रावसाहेब दानवे यांनी म्हटल होतं. यावर बोलताना म्हणाले की, अमर, अकबर अँथनी या तिघांनी लोकांना न्याय दिला म्हणून हिट झाला. आम्हीही लोकांना न्याय देण्याचं काम करत आहे. मात्र केंद्र सरकारच पाण्यात बुडुन डूबणार असल्याचं ते म्हणाले.