जालना - शासनाने ठरवून दिलेल्या नियम पाळूनच गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. यावर्षी गणेश मंडळांनी संख्या न वाढवता जुन्याच गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना करावी, असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.
माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे टोपेंचं आश्वासन -
जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या ४२ बांधवांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी देण्याच्या मागणीसाठी अंबडमध्ये आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नसल्याचे सांगत या आंदोलकांनी उपचार घेण्यास नकार दिला. अखेर टोपे यांनी आज या आंदोलकांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं.
माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही वाचा -राणेंच्या ED चौकशीचं पुढं काय झालं ? - आमदार वैभव नाईक
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात ज्या बांधवांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना आधीच्या सरकारने दिलेले आश्वासन महाविकास आघाडी सरकार पाळेल. त्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठपुरावा करणार आहे, असेदेखील टोपे यांनी म्हटले आहे.