महाराष्ट्र

maharashtra

जालना जिल्हा परिषदेत सभेची नोटीस न मिळाल्याने भाजप सदस्यांचा सभात्याग

जालना जिल्हा परिषदेत सभेची नोटीस न मिळाल्याने भाजप सदस्यांनी सभा त्याग केला. या वेळी त्यांनी सभा आठ दिवस पुढे ढकलण्याची मागणी

By

Published : Feb 4, 2020, 7:52 PM IST

Published : Feb 4, 2020, 7:52 PM IST

bjp-members-unsubscribed-from-zilla-parishad-house-due-to-not-receiving-notice-of-meeting
जालना जिल्हा परिषदेत सभेची नोटीस न मिळाल्याने भाजपा सदस्यांचा सभात्याग

जालना -नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा बोलविण्यात आली होती. नवनिर्वाचित सभापतींच्या विषय समित्यांच्या सदस्यांची निवड आज करण्यात येणार होती. मात्र, मतदान करणाऱ्या सदस्यांनाच या सभेची नोटीस न पोहोचल्याने भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला आणि ही सभा आठ दिवस पुढे ढकलण्याची मागणी केली.

जालना जिल्हापरिषदेत सभेची नोटीस न मिळाल्याने भाजपा सदस्यांचा सभात्याग

सर्व सदस्यांना व्हॉट्सअपद्वारे सभेची सूचना देण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांनी दिली. मात्र, यावर सदस्यांचे समाधान न झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी हस्तक्षेप करून सन 2000 पासून सदस्यांना मेसेज, ई-मेल, आणि अन्य कोणत्याही मार्गाने सूचना पाठविल्या तरी चालतात असे शासनाचे निर्देश असल्याचे सांगितले. यानंतरही सदस्यांचे समाधान न झाल्याने भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य अवधूत खडके, गणेश बापू फुके, यांच्यासह अन्य सदस्यांनी सभात्याग केला.

या सभेला नवनिर्वाचित उपाध्यक्ष महेंद्र पवार, समाज कल्याण समिती सभा सभापती परसुवाले सईदाबी, महिला व बालकल्याण समिती सभापती आयोध्या जयप्रकाश चव्हाण, आणि उर्वरित दोन समित्यांचे सभापती प्रभा विष्णू गायकवाड आणि पूजा कल्याण सपाटे यांच्यासह जिल्हा परिषदचे अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details